गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड राजीनामा देण्याची शक्यता

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड राजीनामा देण्याची शक्यता

मुंबई, १६ फेब्रुवरी २०२१: पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात राहत्या इमारतीवरून आत्महत्या केली होती. या आत्महत्या प्रकरणात अरूण राठोड या तरूणाचे नाव प्रखरतेने समोर येत आहे. पूजा चव्हाण आत्महत्येनंतर अनेक ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल होत आहे, यात शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्यासोबत असलेल्या कथित प्रेमसंबंधावरून पूजाने आत्महत्या केली असा आरोप भाजपाकडून केला जात आहे, यासाठी पुरावा म्हणून देण्यात येत असलेला ऑडिओ क्लिपमधील तो आवाज कोणाचा आहे याचा तपास सुरू आहे.

विरोधी पक्षांनी कारवाईसाठी धरलेली मागणी मुळे राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर दबाव निर्माण होताना दिसत आहे. अश्यात आता ते मंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे येत आहे. येत्या गुरुवारी पोहरादेवी येथे ते आपल्या राजीनाम्याची घोषणा करतील, असे सांगितले जात आहे.

पूजा चव्हाण प्रकरणाची सखोल आणि व्यवस्थित चौकशी होऊन सत्य लोकांसमोर येईल. त्यानंतर गरज पडल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र आता यावरुन शिवसेनेतील नेत्यांमध्येच दोन गट पडले आहेत. यापैकी एक गट नैतिकता जपण्यासाठी संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा, अशा मताचा आहे. तर दुसरा गट संजय राठोड यांच्यावर कुठलीही कारवाई होऊ नये, असे म्हणत आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सगळ्याबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version