ड्रग्ज प्रकरणात एनसीबी कडून लोकप्रिय कॉमेडियन भारती सिंहच्या घरावर छापा

मुंबई, २१ नोव्हेंबर २०२०: ड्रग्ज प्रकरणात एनसीबीची चौकशी सातत्यानं सुरू आहे. एनसीबीच्या चौकशीच्या वर्तुळात घेतलेल्या व्यक्तींची एकामागून एक नवीन नावं पुढं येत आहे. आता एनसीबीनं अंधेरी येथील देशातील लोकप्रिय कॉमेडियन भारती सिंह हिच्या घरावर छापा टाकला आहे. या प्रकरणात अधिक तपशील समोर आला नाही. ड्रग्स प्रकरणात अनेक सेलिब्रेटींना एनसीबीनं लक्ष्य केलं आहे. नुकतीच अभिनेता अर्जुन रामपालवरही एनसीबीनं कसून चौकशी केली आणि त्याच्या घरी छापा टाकला.

भारती सिंग हिच्या विनोदानं देशातील नागरिक चांगलेच प्रभावित आहेत. सध्या ती कपिल शर्मा शोचा एक भाग आहे आणि शोमध्ये आपल्या कॉमेडीसह सर्वांना हसवताना दिसते आहे. भारतीच्या घरावर छापा टाकल्याच्या बातमीनं तीच्या चाहत्यांना नक्कीच निराश केलं आहे. तथापि, या संदर्भात अजून तपशील येणं बाकी आहे. हे बघण्याजोगं असंल की एनसीबी भारतीवर कोणती कारवाई करते किंवा नाही.

रियाला प्रथम घेण्यात आलं ताब्यात

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात, एनसीबीनं चौकशी सुरू केल्यापासून बॉलिवूडच्या बर्‍याच स्टार्सना लक्ष्य केलं आहे. प्रथम रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांना एनसीबीनं ताब्यात घेतलं. रिया जवळपास एक महिन्यानंतर बाहेर आली. त्यांच्या खेरीज एनसीबीनं दीपिका पादुकोण, रकुल प्रीतसिंग आणि सारा अली खान यांसारख्या अनेक नामांकित अभिनेत्रींना समन्स पाठविले व त्याबाबत सविस्तरपणे विचारणा केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा