नवी दिल्ली : आपल्याला तर माहिती आहेच की, इंटरनेट हे माहिती मिळवण्यासाठी जितकं उपयुक्त आहे. तितकंच ते त्रासदायक आणि धोकादायकही आहे. त्यामुळे हल्ली खासगी माहिती लीक होणं, नकळत पैशांचे व्यवहार होणं असे प्रकार सरास घडताना दिसतात. आता इंटरनेट वापरताना ज्यांना पॉर्न पाहण्याची सवय आहे. त्यांना इंटरनेटचा धोका जास्त संभवतो आहे.
याबाबत एका वृत्तपत्ताने दिलेल्या माहितीनुसार, इंटरनेट हॅकर्स सध्या पॉर्न पाहणाऱ्यांना निशाणा बनवत आहेत.
हॅकर्स नियमित पॉर्न पाहणाऱ्या व्यक्ती शोधून काढून त्यांच्याकडे पैशांची मागणी करत आहेत. कित्येक युजर्सना, तुम्ही पॉर्न पाहत असताना तिचा व्हिडीओ रेकॉर्ड झाला आहे. तो व्हायरल होऊ द्यायचा नसेल, तर पैस द्या, अशी धमकी दिली जात आहे.
ही धमकी खरी वाटावी यासाठी हॅकर्स एक पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन युजर्सना पाठवतात. तसंच इमेल पाठवून पैशांची मागणी केली जाते. मग युजर्स हे प्रेझेन्टेशन खरं मानून मागितलेली रक्कम द्यायला तयार होतात.
पैसे न पाठवल्यास तुम्ही पॉर्न पाहत असतानाचा व्हिडीओ तुमच्या मित्रमंडळी आणि कुटुंबीयांमध्ये तसेच इंटरनेटवर व्हायरल करू अशी धमकीही दिली जाते. घाबरलेला युजर मग मागितलेली रक्कम त्यांना पाठवतो. अनेक युजर्स अशा हॅकर्सची शिकार झाले आहेत. त्यामुळे अशा कोणत्याही मेलवर विश्वास न ठेवण्याचं आणि तिथे नमूद लिंकवर क्लिक न करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.