नागपूर : आज काल मोबाईल है सवयीचे साधन बनले आहे. केवळ सवयीचे साधन नव्हे तर हव्या त्या गोष्टी मोबाईलवर क्षणात शोधता येतात. मग त्या गोष्टी चांगल्या असो किंवा वाईट. परंतु त्याचा वापर वाईट गोष्टींसाठी जास्त होत असल्याचा दिसून येत आहे. मोबाईलवर पॉर्न बघणे हे काही नवीन राहिलेले नाही. मुलांचे मोबाईलवरून फोर बघण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. या कारणावरून सरकारने भारतातून पॉर्न साईट ब्लॉक सुद्धा केल्या होत्या. परंतु काही ना काही तोडगा काढून ह्या साईट ॲक्सेस केल्या जात आहेत. त्याचेच एक गंभीर स्वरूप समोर आले आहे. पॉर्न बघण्याच्या हॅबिट मुळे एका १४ वर्षीय मुलाने गळफास घेतला आहे.
नागपूरातील हुडकेश्वर येथे मोबाइलच्या अतिवापरामुळे एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
या मुलाचे नाव वंश राजू इमला असे असून तो आठवीत शिकत होता. त्याची आई एका खासगी कंपनीत काम करते. वंश हा त्याच्या आई व आजीसोबत गजानन परिसरात राहत होता.
वंश गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होता. कोणत्याही गोष्टीत त्याचे लक्ष लागत नव्हते. सतत मोबाइलवर काहीतरी करीत असे. त्यातच मोबाइलचे व्यसन असल्याची माहिती समोर आली. वंशच्या आईने चिडून त्याच्या हातून मोबाइल काढून घेतला. यामुळे वंश खूप अस्वस्थ झाला व आईवर प्रचंड चिडला. काही वेळाने त्याची आई घराबाहेर पडली आणि त्याने मागे गळफास लावून आत्महत्या केली.
पोलिसांच्या तपासात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याच्या मोबाईल हिस्ट्रीतून वंशला पॉर्न बघण्याची सवय होती. अनेकदा घरातल्यांपासून लपून तो मोबाइलमध्ये पॉर्न बघत बसायचा.