पुणे हादरले; पोर्शे अपघात प्रकरणात न्यायालयात खटला सुरू होणार

37
Pune Poarshe Apghat Pune Klyaninagar News
पुणे हादरले; पोर्शे अपघात प्रकरणात न्यायालयात खटला सुरू होणार

Pune Porsche accident: पुणे शहरातील कल्याणीनगर येथे घडलेल्या थरारक पोर्शे अपघात प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले होते. एका बड्या बापाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगात पोर्शे कार चालवून निष्पाप तरुण-तरुणींना चिरडले होते. या घटनेने केवळ पुणेच नव्हे, तर संपूर्ण देश हादरला होता. आता या खटल्याची न्यायालयात लवकरच सुनावणी सुरू होणार आहे.या प्रकरणातील एक खटला बाल न्यायालयात, तर दुसरा खटला शिवाजीनगर सत्र न्यायालयात चालवला जाणार आहे.

या अपघातानंतर, अल्पवयीन मुलाच्या घरच्यांनी संपूर्ण यंत्रणा हाताशी धरण्याचा प्रयत्न केला होता. आरोपी मुलाचे आजोबा, आई-वडील आणि ससून रुग्णालयातील डॉक्टर यांनाही अटक करण्यात आली होती. या घटनेमुळे न्यायव्यवस्था आणि पोलिस प्रशासन यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, आता आरोपपत्र दाखल झाल्यानंतर, या खटल्याची सुनावणी लवकरच सुरू होणार आहे.

या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून शिशिर हिरे काम पाहणार आहेत, तर बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ व माजी जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.याशिवाय, पुणे पोलिसांनी मागील वर्षात पकडलेल्या साडेसात कोटी रुपयांच्या ड्रग्जची होळी २५ मार्च रोजी केली जाणार आहे. मात्र, कुरकुंभ ड्रग्ज प्रकरणात पकडलेल्या ३ हजार ६७४ कोटी रुपयांच्या ड्रग्जचा यात समावेश नाही, त्याची प्रक्रिया एप्रिल महिन्यात पूर्ण होईल.या खटल्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. निष्पाप जीवांना न्याय मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा