Positive Marathi News Live Updates News:भारतात दररोज असंख्य घटना घडत असतात-काही सकारात्मक, काही नकारात्मक.मात्र, नकारात्मक बातम्यांमध्ये अडकून सकारात्मक घडामोडींकडे दुर्लक्ष होणे ही मोठी शोकांतिका आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत भारतातील अशाच काही सकारात्मक बातम्या ज्या तुमच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटवतील आणि तुमच्या मनात आशा व प्रेरणा निर्माण करतील.
आषाढी वारी 2025 च्या निमित्ताने पंढरपूरच्या पवित्र यात्रेत सहभागी होणाऱ्या 1109 दिंड्यांना महाराष्ट्र सरकारकडून प्रत्येकी 20,000 रुपयांचे अनुदान जाहीर!पुण्यात दिव्यांगांसाठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन,
गौतम बुद्धांच्या स्मरणार्थ मूर्ती आणि स्तूप उभारण्याची योजना,
नगरच्या ऐतिहासिक ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्यात पहिल्याच वर्षी 30 दिंड्यांचा सहभाग,
सोलापुरात इस्कॉनच्या रथोत्सवाची भव्य मिरवणूक 2 जुलैला,
पुण्यात सतार महोत्सवाची दमदार सुरुवात,
एशियन यूथ गेम्सच्या निवड चाचणीसाठी अहिल्यानगरच्या 3 तायक्वांदो खेळाडूंची निवड,
आणि MPL मध्ये पुणेरी बाप्पाने कोल्हापूर टस्कर्सवर मिळवलेला दणदणीत विजय!