गोल पोस्ट महाराष्ट्र सकारात्मक बातम्या | News Uncut | Marathi | Live Updates

सकारात्मक बातम्या | News Uncut | Marathi | Live Updates

Positive News Marathi Uncut Live Updates: भारतात दररोज असंख्य घटना घडत असतात – काही सकारात्मक, काही नकारात्मक. मात्र, नकारात्मक बातम्यांमध्ये अडकून सकारात्मक घडामोडींकडे दुर्लक्ष होणे ही मोठी शोकांतिका आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत भारतातील अशाच काही सकारात्मक बातम्या ज्या तुमच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटवतील आणि तुमच्या मनात आशा व प्रेरणा निर्माण करतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या आणि प्रेरणादायी बातम्या! पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितलंय की यंदा सर्व नक्षत्रांत पाऊस बरसणार, ज्यामुळे खरीप आणि रब्बी पिकांना मोठा फायदा होणार आहे. पुण्यातील सह्याद्री रुग्णालयाने दुर्मिळ शस्त्रक्रियेद्वारे कॅमेरुनच्या महिलेचे गर्भाशय वाचवण्यात यश मिळवलंय. नागपूरच्या मनपा शाळांमध्ये ‘द हॅप्पी स्कूल’ प्रोजेक्टची सुरुवात झाली आहे, तर मुख्यमंत्री म्हणाले, भाडेवाढ न करता सर्व लोकल गाड्या AC करणार! गडचिरोलीत अगरबत्ती उत्पादनातून 1500 महिलांना रोजगार मिळालाय, आणि पूजेच्या साहित्याची मागणी 20% वाढलीय. नगरच्या राहाता तालुक्यातील कोल्हारची केळी आता इराणला निर्यात होतेय. तसेच, ग्लोबल पुलोत्सवात उस्ताद अमजद अली खान यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय, आणि WPL मध्ये पुणे वॉरियर्सने रायगड रॉयल्सवर 4 गडी राखून विजय मिळवला! या सर्व बातम्यांचे तपशील जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा!

error: Content is protected !!
Exit mobile version