भाजपसाठी सकारात्मक संकेत, उत्तर प्रदेश पंचायत निवडणुकीत ६१ मुस्लिम उमेदवार विजयी

6

उत्तर प्रदेश, १८ मे २०२३: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असतानाच १३ मे रोजी उत्तर प्रदेशमधील स्थानिक स्वराज संस्था निवडणूकीचाही निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपने आपले राजकीय वर्चस्व कायम ठेवले. मात्र यंदा प्रथमच या निवडणुकीत भाजपचा ६९१ मुस्लिम उमेदवारांपैकी ६१ जणांचा विजय झाला आहे.

राज्यात आतापर्यंत समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी या पक्षांनंतर आता भाजपमध्येही मुस्लिम उमेदवारांचा टक्का वाढला आहे.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हे सकारात्मक संकेत असल्याचे मानले जात असून, या बदलांची उत्तर प्रदेशमध्ये राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. उत्तर प्रदेशमध्ये सुमारे २० टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे.

हिंदुत्वाचा पुरस्कार करत भाजपने सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत बाजी मारली. यानंतर आता भाजपला राज्यात मुस्लिम बांधवांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. राज्यात आतापर्यंत समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी या दोन पक्षांनंतर आता भाजपमध्येही मुस्लिम उमेदवारांचा टक्का वाढला आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी शुभं संकेत मानले जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा