राज्यात तिसऱ्या लाटेची संभाव्य शक्यता, निर्बंध वाढविण्याचा आरोग्यमंत्र्याचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

मुंबई ११ जुलै: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला आळा घालत कोरोनाचा प्रभाव कमी करण्यात राज्य सरकारला यश आलं. पण सर्व सामान्य जनतेला याचं गांभीर्य दिसत नाही, असं दिसतय. बुशी डॅम, सिमला, मनाली येथे लोकांची गर्दी पाहता कोरानाची तिसरी लाट येणार , हे जवळ जवळ निश्चित झाले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा निर्बंध कडक करण्याची गरज निर्माण झाली आहे. नो मास्क आणि नो सोशल डिस्टंसिंग  याची लोकांना गरज वाटत नसल्याचे सरकारच्या निदर्शनास आले.
संचारबंदी अस्तानादेखील शनिवार आणि रविवार लोक बाहेर पडत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा निर्बंध वाढवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. त्यानुसार पुढील आठवड्यात निर्बंध वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा