महाराष्ट्रात राजकीय वादळ येण्याची शक्यता, काँग्रेसचा एक गट भाजपच्या संपर्कत

मुंबई, २ सप्टेंबर २०२२: एकनाथ शिंदेंनी महत्त्वाच्या मंत्र्यांसह आमदारांना घेऊन बंड करत शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का दिला. कोलमडलेल्या शिवसेनेवर संकट आणत त्यांनी आपला वेगळा गट स्थापन करत भाजपा सोबत सरकारही आणलं. आता शिवसेनेनंतर भाजपा ने आपला मोर्चा काँग्रेसकडे वळवल्याचं दिसत आहे. काँग्रेस ही लवकरच फुटण्याची शक्यता आहे.

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने आता नवा राजकीय भूकंप होणार असल्याची माहिती मिळत आहे. अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. त्यानंतर आता त्यांनी फडणवीसांची भेट घेतल्याने राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

शिंदे भाजप सरकार स्थापन झाल्यावर जवळपास एक महिन्याने मंत्रिमंडळ विस्तार झाला. पण हा विस्तारही केवळ पहिल्या टप्प्यात झालाय. आता पुन्हा साधारण एका महिन्याचा काळ गेला असून दुसऱ्या टप्प्यातला विस्तार अर्धवट आहे आता हा दुसऱ्या टप्प्यातला मंत्रिमंडळ विस्तार धक्कातंत्राने होण्याची माहिती मिळत आहे.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस चे ही दोन मंत्री या मंत्रिमंडळात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसचा एक मोठा गट काही दिवसात भाजपात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन माजी मंत्र्यांना मंत्रिपद मिळण्याची ही शक्यता आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याचं बोललं जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा