ठाणेतील व्यावसायिकाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आले आहे

मुंबई , ७ मार्च २०२१ : ठाणे व्यावसायिका मनसुख हिरेन यांचा प्राथमिक पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे. मनसुखचा मृतदेह सुमारे १० तास पाण्यात होते असे रिपोर्ट मधुन आढळून आले  आहे. चेहऱ्यावर आणि मागच्या भागावरही जखमांच्या खुणा सापडल्या आहेत. मनसुख यांची मृतदेह व्हिसेरा फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठविला होते. हा तपशील अहवाल मिळाल्यानंतर अनेक प्रश्नांची उत्तरे स्पष्ट होतील.
५ फेब्रुवारीला मनसुखचा मृतदेह ठाण्याजवळील कळवा खाडीत सापडला होता . पोलिसांनी आत्महत्या केल्याचे सांगितले होते, परंतु कुटुंबीयांनी ते नाकारले होते , गेल्या काही दिवसांपासून जे कार मनसुख चालवत ते कार २५ फेब्रुवारीला अँटिल्यापासून २०० मीटर अंतरावर संशयास्पद परिस्थितीत सापडले होते. या कारमध्ये जिलेटिनच्या २० काठ्या आणि  धमकीचा पत्र मिळाले होते . पोस्टमॉर्टम अहवाल आणि त्यासंबंधित काही प्रश्नांची उत्तरे वाचा…
सुरुवातीच्या पोस्टमॉर्टम अहवालात काय आढळले ?
मनसुख यांच्या प्राथमिक पोस्टमॉर्टम अहवालात चेहऱ्यावर व डोळ्यावर जखमा असल्याचे निशाण दाखविण्यात आले आहे. मागच्या दोन ठिकाणी जखमाही सापडले आहे. जखमा केव्हा आणि कसे देण्यात आले, याचा उल्लेख अहवालात केलेले नाही. तसेच कोणतेही अधिकृत  विधान  देखील आले नाही.
मनसुखच्या मृत्यूची वेळ काय होती ?
मृतदेह सापडल्याच्या १२ ते १३ तास आधी मनसुख हिरेनचा मृत्यू झाल्याचे अहवालातून नक्कीच उघड झाले आहे. तारीख आणि वेळेचा उल्लेख नाही. मनसुखचा मृतदेह ८-१० तास पाण्या खाली होते. कलिनाच्या फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेतून मनसुखचा विसरा अहवाल मिळण्यास किमान १५ दिवसांचा कालावधी लागेल.
तोंडाला रुमाल बांधलेला होता, अहवालात त्याचा उल्लेख आहे काय ?
रुमालाबाबत अधिकृतपणे पोलिसांनी कोणतेही विधान केलेले नाही, तसेच पोस्टमार्टम अहवालातही त्याचा उल्लेख केलेला नाही.
प्रारंभिक पोस्टमॉर्टम अहवाल एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचला होता ?
नाही डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम अहवालात आपले मत राखून ठेवले आहे. डॉक्टर सध्या रासायनिक विश्लेषकांच्या अहवालाची वाट पाहत आहेत , म्हणजेच फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच मृत्यूशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे स्पष्ट होतील.
न्युज अनकट प्रतिनिधी : एस राऊत

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा