लाटांपासून वीज निर्मिती, ‘आर्यन्स् ग्रुप ऑफ कंपनीज’कडून उद्घाटन

पुणे, २८ मार्च २०२१: ‘आर्यन्स् ग्रुप ऑफ कंपनीज’ ने आज आपल्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले. काल २७ मार्च रोजी कंपनी आपल्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पाडणार होती. मात्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सरकारच्या नवीन नियमानुसार होणारी संभाव्य गर्दी टाळत कंपनीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. ‘आर्यन्स् ग्रुप ऑफ कंपनीज’अनेक क्षेत्रांमध्ये काम करत आहे. या आपल्या प्रकल्पांमधून कंपनी तब्बल १,८०० पेक्षा जास्त रोजगार निर्मिती करणार आहे.
या क्षेत्रांपैकी एक म्हणजे रिन्यूएबल एनर्जी. याअंतर्गत कंपनी समुद्राच्या लाटांपासून वीज निर्मिती करणार आहे. या प्रकल्पांतर्गत कंपनी भारतासह इतर देशांमध्ये देखील यावर काम करत आहे. जसे की, श्रीलंकेचा समुद्रकिनारा त्या बरोबर यूरोपच्या काही समुद्र किनाऱ्यावर  तसेच भारतातील उत्तराखंड मध्ये काही नद्यांच्या प्रवाह मध्ये देखील कंपनी या प्रकल्पावर काम करत आहे. पारंपारिक पद्धत पाहिली तर पाण्यापासून वीजनिर्मिती करण्यासाठी धरणातील पाण्याचा वापर केला जातो. यासाठी मोठा भूभाग व्यापला जातो तसेच मोठी जोखीम देखील पत्करावी लागते. हे सर्व पाहता कंपनीने एक अनोख्या पद्धतीने वीज निर्मिती करण्याचा शोध लावला आहे आणि यासाठी भारत सरकारने देखील मान्यता दिले आहे.
महत्त्वाचं म्हणजे या प्रकल्पाअंतर्गत जी साधने व यंत्रे वापरली जाणार आहे ती सर्व भारतामध्येच तयार केले जाणार आहे. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत या सर्व साधनांची निर्मिती भारतातच केली जाणार आहे. शेकडो रोजगार देखील निर्माण होणार आहेत. कोरोना नंतरच्या काळात रोजगार निर्मिती मध्ये ‘आर्यन्स् ग्रुप ऑफ कंपनीज’महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.
या प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते. ज्यामध्ये ‘आर्यन्स् ग्रुप ऑफ कंपनीज’ चे सी ई ओ श्री. मनोहर जगताप, ‘आर्यन्स् ग्रुप ऑफ कंपनीज’ चे सदस्य श्री. जोश्वा, श्री. विपुल बंसल- पी. एस. (प्रायव्हेट सेक्रेटरी) फायनान्स मिनिस्टर, श्री. बिंदू कुमार- पी. एस. मिनिस्टर ऑफ स्टेट फायनान्स मिनिस्टरी, श्री. डॉ. अजयभूषण प्रसाद पांडे- फायनान्स सेक्रेटरी, श्री. विवेक कुमार, पी. एस. टू पीएमओ (प्रधानमंत्री कार्यालय), श्री. प्रतिक दोशी- ओएसडी रिसर्च अँड स्ट्रॅटेजी डिपार्टमेंट पीएमओ, श्री. डॉ. राजीव कुमार- व्हाईस चेअरमन निती आयोग, श्री. अनुप वादुवा- सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, श्री. विवेक कुमार देवगन- ॲडिशनल सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ पॉवर आदी मान्यवर उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा