प्रा.दुष्यंत सोमवंशी यांचे यूजीसी नेट परीक्षेत घवघवीत यश

शिरूर : भारतात राष्ट्रीय पातळीवर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे डिसेंबर २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या यूजीसी नेट परीक्षेत “मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम ” या विषयात प्रा.दुष्यंत सोमवंशी यांनी ९३.७९ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले.
सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी ही परीक्षा घेतली जाते. डिसेंबर २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या यूजीसी नेट परीक्षेत एकूण १,०३४,८७२ विद्यार्थ्यानी नोंदणी केली तर ७,९३,८१३ एवढ्या विद्यार्थ्यानी परीक्षेत सहभाग घेतला. ३१ डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार सहाय्यक प्राध्यापक पदासाठी एकूण फक्त ६०,१४१ विद्यार्थी पात्र ठरले. त्यामधील “मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम” या विषयात फक्त ५५४ विद्यार्थी पात्र ठरले. पैकी ओबीसी विभागात फक्त १३२ विद्यार्थी पात्र ठरले. यामध्ये प्रा. दुष्यंत सोमवंशी यांनी ८ वा क्रमांक पटकाविला.
प्रा. दुष्यंत सोमवंशी हे सध्या पुणे स्थित अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या स्कूल ऑफ फिल्म अ‍ॅण्ड मीडिया विभागात सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. आपल्या या यशाच्या मागे आपली पत्नी प्रा. तपस्या सोमवंशी, मुले सिहान आणि हृदया त्याचबरोबर आई-वडील व इतर परिवार तसेच सर्व मित्र मंडळींची मोलाची भूमिका आहे असे ते सांगतात. मास कम्युनिकेशन या विषयात डॉक्टरेट करून देशाच्या विकासामध्ये खारीचा वाटा उचलण्याचा त्यांचा माणस आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा