गोल पोस्ट गुन्हा प्रभादेवी राडा प्रकरण; पंचवीस शिवसैनिकांवर गुन्हा दाखल, पाचजण अटकेत

प्रभादेवी राडा प्रकरण; पंचवीस शिवसैनिकांवर गुन्हा दाखल, पाचजण अटकेत

मुंबई, ११ सप्टेंबर२०२२: प्रभादेवीत मध्यरात्री झालेल्या शिवसेना-शिंदे गटातील राडा प्रकरणी दादर पोलिसांनी शिवसेनेच्या २५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांचाही समावेश आहे‌.

शिंदे गटातील संतोष तेलवणे यांच्या फिर्यादीवरुन दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश सावंत, संजय भगत आणि इतर दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या हातात तलवार व चॉपर आणि इतर हत्यारं होती. अशी तक्रार संतोष तेलवणे यांनी केली आहे.

या घटनेमुळे शिंदे गटाचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शाखाप्रमूख संतोष तेलवणे यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे‌. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाकडूनही सदा सरवणकर यांच्यासहित काही लोकांच्या विरोधात दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे‌.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version