गुजरातमध्ये भाजपला धक्का, प्रदीपसिंह वाघेला यांचा सरचिटणीसपदाचा राजीनामा

गांधीनगर, ५ ऑगस्ट २०२३ : गुजरातमधील भाजप नेते प्रदीपसिंह वाघेला यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करत असलेल्या भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्यानंतर प्रदीपसिंह वाघेला हे गुजरात भाजपमधील दुसरे प्रभावी नेते होते.

पक्षाच्या सरचिटणीसपदाच्या राजीनाम्यावर प्रदीपसिंह वाघेला यांनी पुढील काही दिवसांत सर्व काही ठीक होईल असे म्हटले आहे. वाघेला यांची १० ऑगस्ट २०१६ रोजी गुजरात भाजपचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. भाजप कार्यालयाने, वाघेला यांनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिल्याची पुष्ठी केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वर्षभराआधी वाघेला यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेना उधाण आले आहे. या वर्षी एप्रिलमध्ये आणखी एक सरचिटणीस भार्गव भट्ट यांना पक्षश्रेष्ठींनी सर्वोच्च पदावरुन मुक्त केले होते. हे पद अजूनही रिक्त आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा