उस्मानाबाद, रामेश्वर : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी तसेच त्या वर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन केलेले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाउन सुरू असलं तरी काही ठिकाणी काही गोष्टी शिथिल करण्याचा तर काही ठिकाणी लॉकडाउन अधिक कठोररित्या राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी जीवनावश्यक गोष्टींची दुकाने सोडून बाकी सर्व बंद अाहे. सध्याच्या परिस्थितीत सर्व कामकाज देखील थांबवले आहे. अशा प्रकारे अचानक कामाला स्थगिती लागल्या मुळे मजूरी तसेच हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
या गोष्टी कडे लक्ष देत, रामेश्वर तालुका भूम येथे प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्नधान्य योजनेअंतर्गत मोफत राशन वाटप करण्यात आले. प्रती व्यक्ती ५ किलो तांदूळ अश्या प्रकारे प्राथमिक स्वरूपात हे राशन वाटप करण्यात आले. सरकार कडून देखील मानवतेची जाणीव राखला नागरिकांना शक्य होईल तेवढे आपल्या आजूबाजूच्या गरिबांची मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
(प्रतिनिधी- प्रगती कराड)