प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत ५३,२४८ कोटी रुपयांची मदत

नवी दिल्ली, दि. ३ जून २०२०: प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत १.७० लाख कोटी रुपयांच्या निधीमधून केंद्र सरकारने, महिला, गरीब ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांना थेट रोख मदत आणि अन्नधान्य देण्याची घोषणा केली आहे. या पॅकेजच्या त्वरित आणि प्रभावी अंमलबजावणीकडे केंद्र तसेच राज्य सरकारांचे लक्ष आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे ४२ कोटी गरजूंना ५३,२४८ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत देण्यात आलेल्या मदतीचा तपशील पुढीलप्रमाणे.

• पीएम किसान योजनेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत ८.१९ कोटी लाभार्थींना आतापर्यंत १६.३९४ कोटी रुपयांची मदत गरजेनुसार देण्यात आली आहे.

• २०.०५ कोटी (९८.३३%) महिलांच्या जन धन खात्यात, मदतीच्या पहिल्या हप्त्यापोटी, १००२९ कोटी रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे. यापैकी, जन धन च्या एकूण महिला खातेधारकांपैकी, ८.७२ कोटी महिलांनी (४४%) पहिल्या हप्त्यापोटी जमा झालेली रक्कम खात्यातून काढली आहे. २०.६२ कोटी (१००%) महिलांच्या खात्यात दुसऱ्या हप्त्याचे १०.३१५ कोटी रुपये जमा झाले आहेत. दुसऱ्या हप्त्याच्या जमा रकमेतील, ९.७ कोटी (४७%) खातेधारक महिलांनी पैसे काढले आहेत.

• सुमारे २.८१ कोटी ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांग व्यक्तींच्या खात्यात, दोन हप्त्यांत, एकूण २८१४.५ कोटी रुपये जमा झाले आहेत.

• २.३ कोटी बांधकाम मजुरांना ४३१२.८२ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे.

• आतापर्यंत, एप्रिल महिन्यासाठी ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी १०१ लाख मेट्रिक टन अन्नधान्य घेतले आहे. एप्रिल महिन्यात ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी ७३.८६ कोटी लाभार्थ्यांना ३६.९३ लाख मेट्रीक टन अन्नधान्याचे वाटप केले आहे. तर मे महिन्यात, ६५.८५ कोटी लाभार्थ्यांना ३२.९२ लाख मेट्रिक टन अन्नधान्याचे वितरण करण्यात आले. जून महिन्यात, १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी गरजूंना ३.५८ लाख मेट्रीक टन अन्नधान्याचे वाटप केले आहे. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ५.०६ लाख मेट्रीक टन डाळींचेही वाटप करण्यात आले आहे. एकूण १९.४ कोटी लाभार्थ्यांपैकी १७.९ कोटी लाभार्थ्यांना १.९१ लाख मेट्रीक टन डाळींचे वितरण करण्यात आले आहे.

• प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत, एकूण ९.२५ कोटी गॅस सिलेंडर्सची नोंदणी करण्यात आली असून आतापर्यंत गरजूंना ८.५८ कोटी सिलेंडर्स मोफत वितरीत करण्यात आले आहेत.

• EPFO म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या १६.६१ लाख सदस्यांनी ऑनलाईन पैसे काढण्याच्या सुविधेचा लाभ घेतला असून, ना-परतावा तत्वावर कर्मचाऱ्यांनी ४७२५ कोटी रुपये निधी काढला आहे.

• चालू आर्थिक वर्षात ४८.१३ कोटी मानवी दिवसांचे काम निर्माण करण्यात आले आहे. मजुरीचा दर वाढवल्याविषयीची अधिसूचना १/४/२०२० रोजी जारी करण्यात आली होती. त्याशिवाय, मजुरी आणि वस्तूंची देयके देण्यासाठी राज्यांना २८,७२९ कोटी रुपये रोख निधी देण्यात आला आहे.

•  ५९.२३ लाख कर्मचाऱ्यांच्या खात्यात २४% भविष्य निर्वाह निधीपोटी, ८९५.०९ कोटी रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा