प्रजासत्ताक दिनी राष्ट्रवादी काँग्रेसने नकाशा छापला चुकीचा

मुंबई : देशाचा ७१ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध राजकीय पक्षांनी समाज माध्यमांवरुन शुभेच्छा व्यक्त केल्या. मात्र या शुभेच्छा देताना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून एक मोठी चूक झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटर आणि फेसबूक अकाऊंटवरुन देशाच्या नकाशाचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले. मात्र या छायाचित्रातील नकाशाच चुकीचा देण्यात आला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर समाज माध्यमातून टीका केली जात आहे.
प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या अधिकृत फेसबूक व ट्विटर अकाऊंटवरुन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्याकरिता देशाचा नकाशा पोस्ट केला आहेप

राष्ट्रवादी कॉंग्रेसने शेअर केलेल्या देशाच्या नकाशाच जम्मू-काश्मिर व लडाखची सीमारेषा चुकली आहे. या नकाशात पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन हे भाग वगळण्यात आले आहे. देशाच्या अधिकृत नकाशाऐवजी दुसरात नकाशा यासाठी वापरण्य़ात आला आहे. या चुकीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिकृत अकाऊंट ट्रोल होत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा