पुणे, १७ जुलै २०२३: प्रकाश आंबेडकर यांनी, नुकतीच पुणे जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतींमध्ये असलेल्या कोरेगाव भीमा चौकशी आयोगाच्या सदस्यांची भेट घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. कोरेगाव भीमा चौकशी आयोगा सोबत माझी एक चर्चा झाली असुन कारवाई सुरू आहे. मी काही मुद्दे आयोगापुढे उपस्थित केले आहेत. त्या संदर्भात आयोगाने लेखी प्रतिज्ञापत्र स्वरुपात सादर करावे, असे सांगितले आहे. त्यामुळे २४ जुलैला मी प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे. तीन महत्त्वाचे मुद्दे मांडणार अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
पावसाळी अधिवेशनातून शेतकरी आणि राज्यातील शेतकऱ्यांना काय मिळेल, असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले राज्य सरकारला शेतकऱ्यांचे काही देणे घेणे नाही. रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी सगळ्यात शेवटी असल्याचे दिसून आले. दुबार पेरणीचे संकट आहे याची माहिती यांना आहे का? असा सवाल करत राज्यातील सरकार हे खिशे भरु आहे, अशी टीकाही केली.
यंदा अजित पवारांना दिवाळी एकट्याला साजरी करावी असं वाटत. पुढच्या वर्षी तरी ते कुटुंबासोबत दिवाळी करतील, असे आंबेडकर यांनी सांगितलं. वंचित बहुजन आघाडी भाजप बरोबर जाणार नाही पुढे कोणाबरोबर जाऊ माहिती नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर