स्वखर्चाने व लोकवर्गणीतून प्रकाश बिचकुले यांनी केला दोन किलोमीटर रस्ता

सोलापूर (माढा), दि. १० जून २०२०: सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामध्ये राजकारण, भांडण, तंटे आणि कुरघोडीच्या राजकारणात गुंतलेल्या विकासापासून शेकडो मैल दूर राहिलेल्या गारअकोले (ता माढा) गावाला गावातील तरुणांना आता विकास आणि गावातील सोयी सुविधा यांचे महत्त्व पटू लागले आहे. त्यामुळेच शेकडो वर्षाचा जुना गारअकोले आणि पुणे जिल्हा इंदापूर तालुक्यातील पिंपरी बुद्रुक या गावांना जोडणारा व गावातील लोकसंख्येच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा परंतु राजकारण आणि भांडणतंटे यामुळे अविकसित असणारा हा शेकडो वर्षाचा रस्ता प्रकाश गणपत बिचकुले या तरुणाच्या पुढाकाराने पूर्ण झाला.

याच बरोबर गावातील ज्येष्ठ नागरिक प्रल्हाद केशव पवार, अशोक अजिनाथ केचे, धनाजी पांडुरंग पवार, कोंडीराम बबन पवार, आणि भोसले, केचे, शेळके इत्यादी गावकऱ्यांच्या सहकार्याने दोन किलोमीटरचा हा रस्ता भरून स्वखर्चाने वापरण्यास योग्य केला असून या रस्त्यामुळे गावातील दळणवळणाची मोठी समस्या मिटली आहे.

अशाच पद्धतीने प्रकाश बिचकुले यांचा आदर्श घेऊन गावकरी व गावातील इतर तरुणांनी भांडण तंटे व राजकारणाकडे न वळता गावाच्या विकासासाठी योगदान दिले तर गावाचा विकास नक्कीच होईल असे गौरवोद्गार यावेळी गावातील समाधान केचे, अशोक केचे व गावकऱ्यांनी काढले.

तालुक्यातील रस्त्याच्या बाबतीत अतिशय अडचणीत असलेल्या या गावातील प्रकाश बिचकुले या तरुणाचे कार्य तालुक्याला व तालुक्यातील तरुणांच्या नेतृत्वाला दिशा देणारे असेल असे गावातून व गावातील जेष्ठ नागरिकांमधून बोलले जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा