प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी “मेट्रो” ची धावपळ

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर महामेट्रोने वनाज ते गरवारे महाविद्यालय हा साधारण ५ मेट्रो किलो मीटरचा मार्ग आणि पिंपरी-चिंचवड ते दापोडी हा ६ मेट्रो किलोमीटरचा मार्ग प्राधान्याने सुरू केला आहे.
त्यात पिंपरी चिंचवड ते दापोडी या मार्गचे ६५ ते ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्यात या मार्गावरील फुगेवाडी आणि संत तुकारामनगर येथील स्टेशन सुरू करण्यात येणार आहेत. वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गाचे देखील ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

या मार्गावर आनंदनगर व गरवारे कॉलेज ही स्टेशन सुरवातीला कार्यान्वयीत करण्यात येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली वेळ गाठण्यासाठी मेट्रो प्रशासनाची आता चांगलीच धावपळ सुरू आहे.

त्यामुळे मेट्रोला पुढील दीड महिन्यात उर्वरित ३५ टक्के काम पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे मेट्रोकडून जानेवारीमध्ये ट्रायल रन घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती मेट्रो रिच १ व रिच २ चे प्रकल्प अधिकारी गौतम बिर्‍हाडे यांनी सांगितले आहे.

पुण्यात मेट्रोला सर्वत्र मागणी होत आहे. शहरात चारही बाजूंनी वाहतुकीची कोंडी होते. त्यासाठी मेट्रो गरजेची असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

कर्वे रस्त्यावर मेट्रोच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्याचा तासनतास कोथरूडकारांना सामना करावा लागत आहे. तसेच कर्वे रस्ता आणि पौड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे, ते बुजविण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा