प्रमिती नरके यांना महात्मा फुले समता समाजभुषण पुरस्कार जाहीर

पुरंदर (प्रतिनिधी): अंदोरी ता खंडाळा येथील महात्मा फुले समता विचार मंचच्या वतीने संत शिरोमणी सावतामहाराज तरुण मंडळ व सर्व ग्रामस्थ मंडळ यांच्या सहकार्याने महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जंयती उत्सवानिमित्त देण्यात येणारा सन २०१९ चा राज्यस्तरीय महात्मा फुले समता समाजभुषण पुरस्कार पुणे येथील प्रसिद्ध सिनेअभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या प्रमिती नरके यांना जाहीर झाला असुन या पुरस्काराचे वितरण रविवार दि ५ जानेवारी रोजी सांय ७ वाजता वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकानी दिली.

अंदोरी येथील महात्मा फुले समता विचार मंचच्या वतीने महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जंयती उत्सवानिमित्त राजकीय, सामाजिक, सहकार, कला, क्रिडा, साहित्य, कृषी, उद्योग आदी क्षेत्रामध्ये समाजहित डोळयासमोर ठेवुन प्रामाणिक काम करणाऱ्या व्यक्तीना महात्मा फुले समता समाजभुषण पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित करण्यात येते. महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार अभिनयाच्या माध्यमातुन जनतेपर्यत पोहचवण्यासाठी प्रामाणिक काम केल्याबद्दल संत तुकाराम मालिकेतील अवलीफेम प्रसिद्ध सिनेअभिनेत्री प्रमिती नरके
यांना सन २०१९ चा महात्मा फुले समता समाजभुषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार दि. ५ जानेवारी रोजी सांय ७ वाजता वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील
यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. यावेळी नीरा येथील समता पतसंस्थेचे चेअरमन दिलीपदादा फरांदे व लोणंद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत.

हा पुरस्कार आजवर सामाजिक कायकर्ते दशरथ फुले, श्रमजीवी सामाजिक संघटना साताराचे बाळासाहेब कोळेकर, पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष डॉ दिगंबर दुर्गाडे, माण खटाव विधानसभा मतदार संघाचे जलनायक आमदार जयकुमार गोरे, वाई विधान सभा मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक सोलापुर सागर धोमकर, प्रसिध्द विचारवंत हरी नरके, कामधेनु सेवा परिवाराचे डॉ लक्ष्मणराव आसबे यांना सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला आहे.

या महात्मा फुले समता समाजभुषण पुरस्कार वितरण सोहळयानंतर अभिनेत्री प्रमिती नरके यांचे “अभिनेत्री घडत असताना” या विषयावर व्याख्यान होणार असुन, कार्यक्रमाअगोदर महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची गावातुन मिरवणुक काढण्यात येणार आहे. या महात्मा फुले समता समाजभुषण पुरस्कार वितरण सोहळयासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक व ग्रामस्थ अंदोरी यांनी केले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा