फलटण, सातारा ०४ ऑगस्ट २०२३ : वेद सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था वरुड आयोजित, स्मृती श्री.आयुतचंडी महायज्ञ अनुष्ठान सोहळ्याप्रसंगी सातारा जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी चेअरमन प्रमोदअण्णा झांबरे यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रमोद झांबरे यांना मिळालेला समाज भूषण हा पुरस्कार त्यांच्या कार्याची दखल घेणारा आहे. त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
औंध तालुका खटाव येथे वेद सामाजिक संस्थेच्या वतीने येथे धार्मिक यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या यज्ञ सोहळ्यामध्ये वेदमूर्ती गुरुवर्य शंकरराव खटावकर स्मृती प्रित्यर्थ पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम झाला. या प्रसंगी आसू तालुका फलटण येथील प्रमोद सदाशिव झांबरे यांना समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रमोद सदाशिव झांबरे हे अनेक वर्षापासून धार्मिक सामाजिक राजकीय शैक्षणिक कार्यात आहेत. अनेक होतकरू व गरजूंना सढळ हाताने मदत करण्यामध्ये प्रमोद झांबरे हे प्राधान्याने काम करत आहेत गरीब व गरजूंना आर्थिक रूपाने मदत करणारे प्रमोद झांबरे म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी अनेक विधायक उपक्रमांना हातभार लावलेला आहे सोनगाव तालुका बारामती येथील पालखी सोहळ्यासाठी सढळ हाताने त्यांनी तब्बल दीड लाख रुपयांचा पाण्याचा टँकर मोफत भेट दिला, असे अनेक विधायक उपक्रम राबवणारे प्रमोद झांबरे सर्व परिचित आहेत.
पुणे येथील हिंदू धर्मप्रवर्तक कालिपुत्र कालिचरण महाराज, मन्ना महाराज नांदेड, चंद्र नयन महाराज पुणे, माजी निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, काँग्रेसचे नेते रणजीतसिंह देशमुख, माजी सभापती संदीप मांडवे, प्राध्यापक बंडा गोडसे, चित्रलेखा माने कदम, प्रदीप शेटे, ओंकार गिरी महाराज गोखळी, सोमनाथ गिरी महाराज, आदिनाथ गिरी महाराज, चौरांध महाराज यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी :आनंद पवार