राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाच्या सातारा व बीड जिल्हा प्रभारीपदी प्रशांत लोंढे

माढा १७ ऑक्टोबर २०२० : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील प्रशांत लोंढे यांची सातारा आणि बीड जिल्हा प्रभारी पदी नियुक्ती केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने राज्यातील जिल्हा प्रभारींची यादी नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये माढा तालुक्यातील प्रशांत लोंढे यांनी ग्रंथालय चळवळीत सातत्य ठेवत गेल्या वीस वर्षापासून काम करत आहेत,ग्रंथालय चळवळीत काम करत असताना राज्यातील ग्रंथालयांच्या अडीअडचणी समजावून घेण्यासाठी त्यांनी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांचा दौरा केला आहे,शासन दरबारी ग्रंथालयासंदर्भातील विविध मागण्यांचा पाठपुरावा करत असतात , त्यांच्यामध्ये ग्रंथालय चळवळीत काम करण्याची असलेली चिकाटी , मेहनत आदी गुणांची दखल घेऊन ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी ग्रंथालय विभागाच्या बीड आणि सातारा जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती केली आहे .

या निवडीबद्दल माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे ,करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे , माढा तालुक्याचे सभापती विक्रमदादा शिंदे , विठ्ठलराव शिंदे शुगर अँड अलाईड कारखान्याचे चेअरमन, जिल्हा परिषद सदस्य रणजीत शिंदे , राज्य समन्वयक सौ.रीताताई बाविस्कर, ग्रंथमित्र प्राचार्य हरिदास रणदिवे , सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय डांगे ,मार्केट कमिटीचे संचालक बिभीषण डांगे,मार्केट कमिटीचे सचिव सतीश पाटील , पिंपळनेर चे सरपंच अभिमान लोंढे , उपसरपंच प्रतिनिधी विजयकुमार लोंढे , सोलापूर राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष शहाजी मुळे , माढा तालुका तलाठी संघटनेचे माजी अध्यक्ष तानाजी लोंढे , सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश यादव,ग्रंथमित्र कांतीलाल साळुंखे , मराठा सेवा संघाचे निलेश देशमुख,उपाध्यक्ष भास्करराव कुंभार आदींनी सतिश लोंढे यांचे अभिनंदन केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी-प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा