इंदापूर नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदी प्रशांत शिताप….

इंदापूर, २९ डिसेंबर २०२०: इंदापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते युवा क्रांती प्रतिष्ठान चे प्रशांत भानुदास सिताब यांची इंदापूर नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदी नुकतीच निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून प्रभाग क्रमांक १ मधील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भानुदास शिताप यांची स्वीकृत नगरसेवक पदी वर्णी लागली आहे.

गेल्या दशकापासून विविध सामाजिक उपक्रम राबवून अनेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे तसेच कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीमध्ये देखील मागे न हटता अहोरात्र समाजकार्य करणारे शिताप यांना त्यांच्या कामाची पोचपावती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिल्याची भावना युवा क्रांती प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाने प्रशांत सिताप यांना नगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक शीताप न्यूज अनकट शी बोलताना म्हणाले की, “खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या मार्गदर्शनाने आपण प्रभागातील रखडलेली कामे तसेच इंदापूर शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू,” असे म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा