प्रसिद्ध गायिका गीता माळी यांचे अपघाती निधन

नाशिक: येथील प्रसिद्ध गायिका गीता माळी मुंबईहून नाशिककडे जात असताना शहापूर येथे गॅस टँकर आणि कारची जोरदार धडक झाली. या अपघातात गीता माळी यांचे निधन झाले. त्यात पती विजय माळी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. माळी यांच्या निधनाने नाशिकमधील कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

गीता माळी गेल्या तीन महिन्यांपासून अमेरिकेत गेल्या होत्या. मुंबई विमानतळावर आल्यानंतर त्यांचे पती विजय माळी यांच्यासोबत त्या नाशिकला कारने येत होत्या. दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांची कार ठाणे जिल्ह्यातील शहापूर परिसरात असलेल्या लाहे फाटानजीक आली असताना श्वानाला वाचविण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर जाऊन धडकली.

या घटनेत माळी यांना गंभीर दुखापत झाली होती. दोन दिवसापुर्वीच याच परिसरात महामार्गावरील हॉटेल परिवार गार्डन समोरच मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या एका गॅस टँकरला पाठीमागून आलेल्या भरधाव कारने (आरजे- १९- टीए-८००५) जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. २०१७ ऑस्ट्रेलियामधील सिडनी या शहरात वीर सावरकर विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी गायिका गीता माळी यांना गायनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या आकस्मित निधनाने कला क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा