‘प्रतिभा संगम’ राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध कवयित्री,गीतकार डॉ. संगीता बर्वें यांच्या हस्ते

पुणे, १७ मे २०२२ : विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा तसेच प्रज्ञेबरोबर प्रतिभा विकसित व्हावी म्हणून अभाविप आणि राष्ट्रीय कलामंचने प्रतिभा संगम नावाने विद्यार्थी साहित्यिकांसाठी एक व्यासपीठ निर्माण केले. आज दिनांक १७ मे ला सकाळी १०:०० वाजता या प्रतिभा संगमाचे पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी महाविद्यालय येथील स्व. प्रा. द. मा. मिरासदार साहित्य नगरी येथे उद्घाटन झाले.

गीतकार बालसाहित्यिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, प्रसिद्ध मराठी कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांच्या हस्ते या २ दिवसीय प्रतिभा संमेलनाचे उद्घाटन झाले. सोबतच, अभाविप राष्ट्रीय संघटन मंत्री श्री. आशिष चौहान, देवगिरी प्रांत अध्यक्ष प्रा. सारंग जोशी, पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री अनिल ठोंबरे, प्रतिभा संगम स्वागत समितीचे अध्यक्ष प्रदीप दादा रावत, स्वागत समितीचे सचिव डॉ. श्रीपाद ढेकणे, निमंत्रक डॉ. सुनील कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन झाले.

१९ व्या राज्यस्तरीय प्रतिभा संगम च्या या संमेलनात आपण ३ वेगवेगळ्या साहित्यिकांची नावे देऊन विशेष कक्ष उभारणी केली आहे.त्यामध्ये संपूर्ण परिसराला स्व. प्रा. द. मा. मिरासदार साहित्य नगरी, मुख्य सभाग्रहाला कवयित्री शांताबाई शेळके सभागृह, व प्रदर्शनी कक्षाला स्व. बाबासाहेब पुरंदरे प्रदर्शनी कक्ष, असे नाव देण्यात आले आहे. स्व. प्रा. द. मा. मिरासदार यांचा साहित्यिक परिचय प्रा. डॉ.आनंद काटीकर यांनी करून दिला. प्रतिभा संगमाचे विद्यार्थी जीवनाचे महत्त्व आणि अभाविप ने प्रतिभा संगमच्या माध्यमातून विद्यार्थी साहित्यिकांसाठी राज्यस्तरीय व्यासपीठ निर्माण करून मोलाचे कार्य केले आहे. असे मत पुण्याचे माजी खासदार स्वागत समितीचे अध्यक्ष प्रदीपदादा रावत यांनी केले.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अभाविपच्या कार्यात विद्यार्थी साहित्यिकांची भूमिका व अभाविपचा कार्य विस्तार याबाबत अभाविपचे राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष चौहान यांनी केले. अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा. डॉ. सारंग जोशी यांनी अभाविपचा कार्य विस्तार व गतिविधि याबाबत मार्गदर्शन केले.

शिक्षण हे फक्त चार भिंतीत मर्यादित राहत नाही. अभाविप ही बिनभिंतीची शाळा असून प्रतिभा संगमच्या माध्यमातून विद्यार्थी साहित्यिक घडविण्यात अभाविपची मोलाची भूमिका आहे. आपल्या ओघावत्या शैलीत त्यांनी लेखनाचा तंत्र आणि मंत्र दिला. आपल्या विविध स्वलिखित कविता सादर करून विदयार्थी साहित्यिकांची मने जिंकली. वास्तवाशी नातं असलं की लेखणांची सुरुवात होते. अनुभवांची अभिव्यक्ती झाली की, साहित्य निर्मिती होते. असे मत १९ व्या प्रतिभा संगम चे उद्घाटक डॉ. संगीता बर्वे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक निमंत्रक प्रा. डॉ. सुनील कुलकर्णी यांनी केले. उद्घाटन सत्रानंतर प्रतिभा संगम चे निमंत्रक प्रा. सुनील कुलकर्णी यांनी संचालन समितीचा परिचय करून दिला. सुत्रसंचालन प्रा. डॉ. गिरीश पवार यांनी, आभार प्रदर्शन डॉ. श्रीपाद ढेकणे यांनी केले यावेळी, स्व. प्रा. द. मा. मिरासदार यांचा संपूर्ण परिवार या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होता.तसेच महाराष्ट्र भरातून सहभागी झालेले विद्यार्थी, पुणे शहरातील साहित्यिक रुची असणारे विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा