प्रवासी आरक्षण प्रणाली आज रात्रीपासून सहा तासांसाठी बंद

मुंबई : प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) ५ जानेवारीच्या रात्री ११.४५ ते ६ जानेवारी रोजी पहाटे ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे यावेळेदरम्यान या काळात इंटरॅक्टिव वॉयस रिस्पॉन्स सिस्टीम (आईवीआरएस), करंट रिझर्व्हेशन, रिफंड काउंटर्स, कोचिंग रिफंड टर्मिनल, पीएनआर सेवादेखील बंद असणार आहे.
१ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून लांब पल्ल्यांच्या प्रवासी एक्स्प्रेसची भाडेवाढ करण्याचा निर्णय लागू करण्यात आला. या घोषणेनंतर मध्यरात्री १२ वाजल्यापासून नवे तिकीट दर प्रति किमीप्रमाणे अपलोड करताना तांत्रिक बिघाड आला.

परिणामी, रेल्वे प्रवाशांना तिकीट खिडक्यांवरून तिकिटे खरेदी करण्याची वेळ आली होती. संगणकामध्ये डाटा संकलित करण्यासाठी पीआरएस सेवा बंद करण्यात येईल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा