प्रवाशी बसमध्ये महिलेला सेक्स करतांना रंगेहाथ पकडले

वृत्तसंस्था: ऑस्ट्रेलियामधील कॅनबेरा येथील न्यू साऊथ वेल्समध्ये एक आगळेवेगळे प्रकरण समोर आले आहे. प्रवाशांची गर्दी असलेल्या बसमध्ये मागील सीटवर बसून आपल्या मित्राबरोबर सेक्स करणाऱ्या एका महिलेला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
हे प्रकरणसमोर आल्यानंतर स्थानिक न्यायालयाने या महिलेविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणामधील महिलेच्या मित्राने आपण मानसिक रुग्ण असल्याचे पुरावे न्यायालयासमोर सादर केल्यानंतर त्याच्यावर कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

याबाबत स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणामध्ये अटक वॉरंट जारी झालेल्या महिलेचे नाव वंडर फ्रेंच असे असून ती ३१ वर्षांची आहे. वंडर ही तिच्या एका मित्राबरोबर शहरातील सार्वजनिक बसमधील मागील सीटवर सेक्स करत होती.

या प्रकरणात २६ नोव्हेंबर रोजी न्यू कॅसल येथील न्यायालयामध्ये सुनावणी होती. मात्र त्यासाठी ही महिला उपस्थित राहिली नाही. त्यानंतर न्यायालयाने तिच्यावरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. वंडरला न्यायालयामध्ये उपस्थित राहण्यासंदर्भात आपण सुचना केली होती असे तिच्या वकिलाने न्यायालयामध्ये स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी वंडरने तिच्याविरोधातील कारवाईवर आक्षेप घेत त्यांच्याबरोबर हुज्जत घातल्याचा आरोप केला आहे. २९ मार्च रोजी वंडर आणि तिचा २४ वर्षीय मित्र रेयॉन जोन्स याला बसमध्ये सेक्स करताना प्रवाशांनी रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर प्रवाशांनी त्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा