गोल पोस्ट स्पॉटलाइट प्रवीण तरडे यांनी घेतले गाणगापूर मध्ये दर्शन, सध्या हंबीरराव मोहिते चित्रपटही चर्चेत

प्रवीण तरडे यांनी घेतले गाणगापूर मध्ये दर्शन, सध्या हंबीरराव मोहिते चित्रपटही चर्चेत

गाणगापूर, १ नोव्हेंबर २०२०: छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे सरसेनापती होण्याचा मान हा ‘हंबीरराव मोहिते’ यांना मिळाला. हंबीरराव मोहिते यांचा जीवनप्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’ असं या सिनेमाचं नाव आहे. सध्या प्रवीण तरडे या पिक्चर साठी ठीक ठिकाणी प्रमोशन करत आहे व याच्याच प्रमोशन साठी ते गाणगापूर येथे आले होते. यानिमित्ताने त्यांनी दर्शन देखील घेतले.

या ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत स्वराज्याचे सेनापती म्हणून शौर्य गाजविलेल्या सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची गाथा पाहायला मिळणार आहे. स्वतः तरडे यात ही भूमिका निभावत आहेत. या चित्रपटासाठी त्यांनी वजनही वाढवलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version