बीड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने शेतीच्या कामाला वेग

बीड, दि.१जून २०२०: बीड जिल्ह्यात रविवारी( दि.३१) रोजी रात्री मान्सून पावसाने हजेरी लावली. रात्री उशिरा पर्यन्त पावसाच्या सरी सुरूच होत्या. अंबाजोगाईत वादळी वाऱ्याने झाडे कोलमडली. असेच वातावरण जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पहायला मिळाले. वादळी वाऱ्यामुळे अंबाजोगाई, वडवणी येथील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. मान्सून पूर्व पावसामुळे शेतकरी आनंदी झाला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात मान्सूनपूर्व मशागतींच्या कामाला वेग आल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

अचानक आलेल्या या पावसाने जनावरांसाठी ठेवलेल्या चाऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय हाताशी आलेले पीकही वाया गेले आहे.

बीड जिल्ह्यात सरासरी १७.७२ मी मी पावसाची नोंद झाली आहे. बीड, वडवणी, पाटोदा, आष्टी , केज, अंबाजोगाई, माजलगाव तालुक्यात पावसाचा चांगलाच जोर होता. विजेचा कडकडाट अन वादळी वाऱ्यासह पावसाने उन्हाची तीव्रता कमी केली. वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचे पहायला मिळाले. विद्युत तारा तुटल्या.

गेल्या काही वर्षात दुष्काळाचा सामना करणाऱ्या बीड जिल्ह्यात मान्सून पूर्व पाऊस पडल्याने शेतीच्या कामाला वेग आला आहे. शेतकरी समाधानी दिसत असून शेतीच्या कामासाठी शेतकऱ्याची लगबग सुरू झाली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा