एमपीएससीच्या पुर्व परिक्षा पुढे ढकलण्यात याव्यात – आकांक्षा चौगुले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीचा आढावा घेऊन सरकारने विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक धाडसी निर्णय घेतलेले आहेत. याबाबत स्टुडंट हेल्पींग युनिटीच्या अध्यक्षा आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांनी सरकारचे आभार मानले. यासोबतच, त्यांनी एमपीएससीच्या पुर्व परिक्षा जी या वर्षी  १३ सप्टेंबर २०२० रोजी घेण्याची तयारी आयोगाने सुरू केलेली आहे ही पुढे ढकलण्याबाबतीत मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी केली.
     
कोरोनाच्या या महामारीच्या काळात सरकारने विद्यार्थ्यांच्या हिताकडे लक्ष देत अनेक मोठे निर्णय घेतले. तसेच, अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यात येऊ नये म्हणून न्यायालयात गेले आहे. मग एमपीएससीच्या परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत असा दुजाभाव का? असा प्रश्न स्टुडंट हेल्पींग युनिटीच्या अध्यक्षा आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांनी मांडला आहे.
     

सरकारने लॉकडाउन ३१ ऑगस्ट पर्यंत वाढवलेले आहे. यात बसगाड्या देखील बंद आहेत. या परिस्थितीत विद्यार्थी अजूनच गोंधळून जातील. यामुळे बसगाड्या कधी सुरू करण्यात येणार आहे हे आधी सरकारने स्पष्ट करावे. यामुळे विद्यार्थी परिक्षेच्या चार दिवस आधी तरी परिक्षा केंद्र असलेल्या शहरात जाऊ शकतील. खाजगी वाहन करून जाणे विद्यार्थ्यांना परवडणारे नाही. तसेच, या परिस्थितीत आपले परिक्षा केंद्र बदलण्याची परवानगी देखील सरकारने दिलेली नाही. राज्यातील लाखो विद्यार्थी या परिक्षेसाठी बसलेले असतात. त्यातील ५०% विद्यार्थी हे पुण्यातच अभ्यास करतात आणि परिक्षा केंद्रासाठी प्राधान्य ते पुण्यालाच देतात. कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर विद्यार्थी जर एकदमच शहराकडे आले तर संक्रमणाचा धोका निश्चित आहे. या परिस्थितीत विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल.
     
अशा प्रकारे अनेक मुद्दे मांडून, सरकारने या मुद्यांचा गांभीर्याने विचार करून कोरोनाची तीव्रता जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत या परिक्षा पुढे ढकलाव्यात, अशी विनंती आकांक्षा चौगुले यांनी पत्राद्वारे मुंख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा