गोल पोस्ट गुन्हा प्रेमी जोडप्याला जिंवत जाळले….

प्रेमी जोडप्याला जिंवत जाळले….

बांदा (उत्तर प्रदेश), ७ ऑगस्ट २०२०: उत्तर प्रदेश राज्य हे गुन्हेगारीचा गढ म्हणून भारतात प्रामुख्यानें ओळखले जाते. तर आता अजून एक मन हेलावून टाकणारी घटना ही उत्तर प्रदेशमध्ये घडल्याचे समोर आले आहे. ज्या मध्ये एका प्रेमी युगलांना जिंवत जाळण्यात आल्याची ह्रदय पिळवटुन टाकणारी घटना घडली आहे.

उत्तर प्रदेशच्या बांदा येथे एक तरुण हा रात्री उशिरा तरुणीला भेटायला आला ते दोघे बोलत असताना हि गोष्ट तरुणीच्या भावाला कळाली. त्याने दोघांना घराच्या खोलीत बंद करुन ठेवले. या विषयावरुन गावात पंचायती बसल्या आणि या दरम्यान भावाने घराच्या छपरावून राॅकेल ओतून घराला आग लावली.

पोलिसांनी तरुणीच्या भावाला ताब्यात घेतले आहे. २५ वर्षांचा भोला आरख हा मुलगा आशाराम मातुंडा पोलिस स्टेशन परिसरातील कर्चा गावात सूरत येथे कामाला होता. तो लॉकडाऊनमध्ये घरी आला होता . त्याच्या गावी राहणाऱ्या एका २० वर्षीय तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध होते.

भोलाचे आजोबा लखन यांनी असे सांगितले की, दुपारी तीन वाजता या तरुणीने भोलाला फोन करून घरी बोलावले होत. दोघेजण एका छप्पर असलेल्या कच्च्या घरामध्ये होते. त्या युवतीच्या घरच्यांनी त्या घराला बाहेरून कडी लावून आग लावून दिली.

धूर व आवाज ऐकून गावकरी तेथे आले आणि त्यांनी दोघांना बाहेर काढले. त्या दोघांनाही अत्यंत जळलेल्या अवस्थेत जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. येथे डॉक्टरांनी या युवकाला मृत घोषित केले. प्राथमिक उपचारानंतर मुलीला कानपूर येथे रेफर केले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक महेंद्र प्रताप चौहान यांनी सांगितले की, दोघांनाही एका खोलीत बंद ठेवून बाहेरून आग लावून जिवंत जाळले. या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत.

या घटनेमुळे समाजात आज देखील प्रेम या भावनेकडे द्वेषाने बघणारा समाज आहे. याची जाणीव होते तर अशाच घटना या फक्त राज्यात घडत नाहीत. तर संपुर्ण भारतात विविध ठिकाणी घडतात. या घटनेमुळे यु पी पुन्हा एकदा शर्मसार झाले आहे आणि या घटनेमुळे गावात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version