मुंबई, दि. २२ जून २०२० : २३ मार्च नंतर संपूर्ण राज्यामध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. यादरम्यान समाज माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता. या काळामध्ये कोविड -१९ च्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर अफवांचा प्रसार करणे तसेच धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणे अशा अनेक घटना समोर आल्या. यासंदर्भातील माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली. आत्तापर्यंत राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ४९४ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २६१ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ४९४ गुन्ह्यांची नोंद कालपर्यंत झाली आहे. जिल्हानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे-
आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी प्लॅटफॉर्मनिहाय दाखल झालेले गुन्हे
• व्हॉट्सॲप- १९५ गुन्हे
• फेसबुक पोस्ट्स – २०३ गुन्हे दाखल
• टिकटॉक व्हिडिओ- २६ गुन्हे दाखल
• ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – ९ गुन्हे दाखल
• इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट- ४ गुन्हे
• अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर – ५७ गुन्हे दाखल
• वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २६१ आरोपींना अटक.
• १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश
न्यूज अनकट प्रतिनिधी