गोल पोस्ट गुन्हा प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा यूएसबी केबलने गळा आवळून खून

प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा यूएसबी केबलने गळा आवळून खून

लखनऊ: उत्तर प्रदेशात ३९ वर्षीय पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अनैतिक संबंधांतन ही हत्या झाल्याचं समोर आल आहे. ४५ वर्षीय वीरेंद्र कुमार हे बीएसएनएलमध्ये कनिष्ठ तांत्रिक अधिकारी म्हणून कार्यरत होते. वीरेंद्र कुमार यांचा मृतदेह रविवारी पोलीस स्टेशन परिसर हद्दीत आढळला होता. या हत्येप्रकरणी उत्तरप्रदेश पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वीरेंद्र कुमार याचं आठ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांना दोन मुलं देखील आहेत. ते आपल्या कुटुंबासोबत आग्रा येथील पंचशील कॉलोनीत राहत होते.
यानंतर त्यांच्या पत्नीने पोलीस स्थानकात धाव घेत सांगितले की, वीरेंद्र कुमार हे शनिवारी रात्री ७ हजार रुपये घरातून बाहेर पडले होते. त्यांना एक फोन कॉल आल्यावर ते घरातुन निघाले परंतु नंतर घरी परतलेच नाहीत.
वीरेंद्र कुमार यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, वीरेंद्र याच्या पत्नीचं एका कनिष्ठ इंजिनिअरसोबत अफेअर सुरु आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांची तपासाची सूत्रे फिरवली. व त्या दिशेने तपास सुरू केला. पोलिसांनी प्रियकर आणि त्याच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची दरडावून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आपला तपास त्या दिशेने सुर केला.त्यावर विरेंद्रची पत्नी आणि तिच्या प्रियकराने सांगितले की, प्रेमात अडथळा येत असल्याने वीरेंद्रची मोबाइल चार्जरच्या यूएसबी केबाने विरेंद्रचा गळा आवळून खून केला. तो मृत झाल्यानंतर दोघांनी त्याचा मृतदेह गाडीत टाकून तो शाहगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका कॉलेजच्या परिसरात टाकला. त्यानंतर रविवारी वीरेंद्र यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या अंगावर जखमा आणि गळा आवळल्याचं दिसून आलं. त्यामुळे वीरेंद्र यांची हत्या झाल्याचं समोर आलं.

पोलिसांनी वीरेंद्रची पत्नी आणि प्रियकराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हत्या, हत्येचा कट रचणे आणि पुरावे नष्ट करणे या गुन्ह्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच या दोघांनाही अटक केली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version