पूर्वतयारी… खेळाची की युद्धाची

भारत आणि पाकिस्तान, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. अशी परिस्थिती असलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांचा सामना आज संध्याकाळी साडे सात वाजता रंगणार आहे. जणू काही क्रिकेट युद्धाची ही सुरुवात आहे. मजूरांपासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांना या सामन्याची उत्सुकता लागून राहिली आहे. प्रत्येक भारतीयाला भारत जिंकेल असा विश्वास वाटत आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानाचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तान भारताला नक्की हरवणार असा विश्वास संघाकडे दर्शविला आहे. भारत मात्र या सामन्यासाठी धार्मिक, अध्यात्मिक आणि सार्वजनिक तयारीमध्ये गुंतला आहे. खास करुन भारत जिंकावा यासाठी विविध ठिकाणी होम, हवन आणि पूजा सुरु आहे. एवढेच नव्हे तर भारताच्या पवित्र गंगा नदीकिनारी दिव्यांची आरास करुन गंगा नदीला जिंकण्यासाठी साकडे घालण्यात आले आहे. अनेक ठिकाणी दुपारपासून मंडळींनी संपूर्णपणे खास चमू करुन बसण्याची व्यवस्था केली आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना याच खेळावरुन राजकारण रंगाताना दिसतय. जम्मू काश्मिरमध्ये होत असलेले दहशतवादी हल्ले आणि दुसरीकडे मॅच यावरुन या राजकारणामुळे खेळाचा भंग होताना दिसत आहे. त्यामुळे किंबहुना आता हे राजकारण खेळानंतर चिघळण्याची चिन्हे दिसत आहे. संघातला प्रत्येक खेळाडू मनापासून या खेळाची तयारी करत आहे. मात्र लक्ष देण्याची गोष्ट अशी की पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तर ने सांगितले आहे की, विराट कोहलीला मॅच जिंकण्याची सवय लागली आहे तर मागच्या खेळाच्या अनुभवाचा नक्कीच भारताला फायदा होईल, तर पाकिस्तानने सरळ वॉक ओव्हर द्यावा असं म्हणत हरभजन सिंगने शोएब अख्तरला एक हरण्याची पूर्व सूचना दिली असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. मी जेव्हा कॅप्टन होतो, तेव्हा मला कधीच भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचचं प्रेशर जाणवलं नाही, असं वक्तव्य माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली याने सांगितलं.
मात्र यातलं राजकारण वेगळंच आहे. त्यात पाकिस्तान काश्मिरच्या लोकांचा जीव घेत आहे, त्यामुळे त्यांना आळा बसायला हवा. केंद्र सरकारने पावले उचलायला हवीत, असं म्हणत केंद्र सरकारवर ओवेसीने निशाणा साधला.  असे अनेक नेत्यांनी याबाबत अनावतपणे सूतोवाच केलं आहे.
आता संध्याकाळची ७.३० ची वेळ ही घटीका भरणारी वेळ आहे. त्यामुळे त्यानंतर होणारा निर्णायक सामना सगळ्यांची उत्कंठा वाढवणार आहे, हे नक्की.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा