राष्ट्रपती पदासाठी निवडणूक पडली पार, अशी होती तयारी

नवी दिल्ली : १८ जुलै २०२२ : लवकरच भारताला नवे राष्ट्रपति मिळतील. राष्ट्रपतिपदासाठी आज मतदान पार पडणार पाळलं. या मतदानाचा निकाल २१ जुलै रोजी‌‌ लागणार आहे. ‌त्यानंतर २५ जुलै रोजी‌ नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी होईल.

संसदेत मतदानाच्या प्रक्रीयेसाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. संसद भवनातील खोली क्रमांक ६३ मध्ये मतदानासाठी ६ बूथ उभारण्यात आले होते. यामध्ये एक बूथ दिव्यांग वोटरसाठी होता.

राष्ट्रपतिपदासाठी एनडीएकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे‌. द्रौपदी मुर्मू या ओडीसातील नेत्या आहेत. राजकीय बलाबल पहाता एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांच्या रुपाने देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपति मिळण्याची शक्यता आहे. द्रौपदी मुर्मू यांनी २०१५ ते २०२१ या काळत झारखंडच्या राज्यपालांची जबाबदारी सांभाळली.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा