शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तयारी बैठक संपन्न

पुणे , ८  फेब्रुवरी २०२१ : आपल्या पुणे शहरातील श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रतिवर्षी १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येते. पण गेल्या दहा महिन्यांपासून सर्व जगावर असलेले कोरोनाचे संकट कमी होत असले तरी काळजी घेणे तेवढेच आवश्यक आहे.
शिवजयंती साजरी करण्याबाबत पुणे महानगरपालिकेतील श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, विविध संस्थाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, पालिकेतील पदाधिकारी, पक्षनेते, नगरसेवक यांची विचारविनिमय बैठक पार पडली.
याप्रसंगी उपमहापौर सौ. सरस्वतीताई शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष श्री. हेमंत रासने, सभागृह नेते श्री. गणेश बिडकर, विरोधी पक्षनेत्या सौ. दिपालीताई धुमाळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, तसेच पदाधिकारी, अधिकारी व शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करता आलेल्या मान्यवरांच्या सूचनांचा विचार करून लवकरच शिवजयंती साजरी करण्याबाबत नियमावली सादर केली जाईल , असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा