गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा इंदापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

इंदापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

इंदापूर, दि.१५ मे २०२०: इंदापूर तालुक्यात उन्हाचा पारा ४०अंशाच्या घरात गेला होता. त्यामुळे वातावरणात चांगलाच उकाडा निर्माण झाला होता. आज सायंकाळच्या सुमारास निमगाव केतकी,भिगवण,इंदापूर आणि परिसरात सायंकाळपासूनच जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

त्यामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली होती. यामध्ये प्रामुख्याने धावपळ झाली ती शेतकरी वर्गाची. जनावरांचा चारा तसेच अन्न धान्य , कांदा, आदी.चे पावसापासून रक्षण करण्यासाठी ते झाकण्याची लगबग सुरू होती. सुसाट वारा सुरू झाल्यापासून विजेने नेहमीप्रमाणे रजा घेऊन आपले कर्तव्य पार पाडले होते.

विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने वातावरण थंड झाले होते . सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावल्याने ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे

error: Content is protected !!
Exit mobile version