४ कीर्ती चक्र आणि ११ शौर्य चक्रांसह ७६ शौर्य पुरस्कारांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी

2

नवी दिल्ली, १५ ऑगस्ट २०२३ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ७७ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPFs ) च्या जवानांना चार कीर्ती चक्र (मरणोत्तर) आणि ११ शौर्य चक्रांसह ७६ शौर्य पुरस्कार प्रदान केले. ११ शौर्य चक्रांपैकी पाच मरणोत्तर आहेत. कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र हे अशोक चक्रानंतर भारतातील दुसरे आणि तिसरे सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार आहेत.

मरणोत्तर कीर्ती चक्र पुरस्कार विजेत्यांमध्ये दिलीप कुमार दास, राजकुमार यादव, बबलू राभा आणि संभा रॉय यांचा समावेश आहे. हे सर्व केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कर्मचारी होते.

शौर्य चक्र (मरणोत्तर) प्राप्त होणाऱ्या पाच जवानांमध्ये आर्मी एव्हिएशन स्क्वाड्रन मेजर विकास भांभू आणि मेजर मुस्तफा बोहरा यांचा समावेश आहे; राजपुताना रायफल्सचे हवालदार विवेक सिंग तोमर आणि राष्ट्रीय रायफल्सचे रायफलमन कुलभूषण मानता यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा