नवी दिल्ली, १७ ऑगस्ट २०२३ : राष्ट्रपती द्रौपदी मर्मू यांच्या हस्ते आज भारतीय नौदलाची अत्याधुनिक युद्धनौका “विंध्यगिरी” लॉन्च करण्यात आली. गार्डनरीच शिपबिल्डर्स इंजिनियरिंग लिमिटेड येथे हा कार्यक्रम पार पडला आहे.
विंध्यगिरी अत्याधुनिक युद्धनौका नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. भारतीय नौदलाकडे कमिशनिंगसाठी पाठवण्यापूर्वी या युद्धनौकेची पुन्हा एकदा चाचणी केली जाईल. त्यानंतर नौदलामध्ये या नौकेचा समावेश होईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या विंध्यगिरीच्या प्रक्षेपणप्रसंगी बोलताना म्हणाल्या, विंध्यगिरी हे भारताच्या सागरी क्षमता वाढविण्याच्या दिशेने वाटचाल करेल.
निलगिरी क्लास फ्रीगेट्स माझगाव डॉक आणि गार्डनरीच शिप बिल्डर्स आणि इंजिनियर्स यांच्यावर या युद्धनौकेची जबाबदारी आहे. एकूण सात युद्धनौका बांधण्यात येणार होत्या. यापैकी पाच लॉन्च युद्धनौका करण्यात आल्या आहेत. निलगिरी, उदयगिरी, तारागिरी, हिमगिरी आणि दुनागिरी अशी या फ्रीगेट्सची नावे आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर