धुळे, १४ ऑक्टोबर २०२२: जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपअध्यक्ष पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया सूरु होती. भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत उद्धव ठाकरे शिवसैनिकांनी गोंधळ केला असून, पन्नास खोके एकदम ओके च्या घोषणा देत शिवसैनिकांनी राडा घातला.
सर्वसाधारण महिला वर्गाचे आरक्षण निघाल्याने मोठी चूरस निर्माण झाली होती. त्यामुळे पालकमंत्री गिरीश महाजन व जिल्ह्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थित अध्यक्ष व उपअध्यक्ष यांची नावे भाजपच्या वतीने जाहीर करण्यात आली. त्यात अश्र्विनी पवार अध्यक्ष तर देवेन्द्र पाटील उप अध्यक्ष पदासाठी नाव निश्चित झाल्याने नामांकन दाखल करण्यात आले.
तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या सुनिता सोनावणे तर उपअध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या मोतनबाई पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आला. महाविकास आघाडीकडे संख्याबळ कमी असले तरी निवडणूक अधिकाऱ्यांना गोपनीय पध्दतीने मतदान घेण्याची मागणी केली आहे.
अडीच वर्ष भाजपमध्ये अंतर्गत वाद होता. यांचा फायदा महाविकास आघाडीला होईल, अशी अपेक्षा महाविकास आघाडीला आहे. यावर निवडणूक अधिकारी काय निर्णय घेईल याकडे सर्व जिल्हाचे लक्ष लागले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर