पत्रकार संघाने हजारो गरजूंचा आशीर्वाद घेतला : दत्तात्रय भरणे

इंदापूर, दि.१७ मे २०२०: राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या माध्यमातून झालेली संचारबंदी व लॉकडाऊन हे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आहे. यामध्ये गरीब कुटुंबियांना अन्नधान्य व जीवन उपयोगी वस्तू जवळपास ६७०० इंदापूर तालुक्यातील कुटुंबांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून मिळाले आहेत. त्यामुळे हजारो गोरगरिबांचा आशीर्वाद पत्रकार संघाला मिळणार आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने गरीब, गरजू व शेतमजूर कुटुंबियांना मोफत अन्नधान्याचे व वस्तूंचे किटचे वाटप इंदापूर तालुक्यातील बाभूळगाव व अवसरी येथे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आज (रविवार) रोजी वाटप करण्यात आले.

यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे -पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते संजय देवकर, पत्रकार संघाचे सचिव सागर शिंदे, इंदापूर तालुका उपाध्यक्ष संदीप सुतार, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख महेश स्वामी, कार्यकारणी सदस्य निखिल कणसे, भिमराव आरडे, शिवाजीअप्पा पवार,सचिन खुरंगे, आबासाहेब उगलमोगले, गणेश कांबळे, विजय शिंदे, दत्तात्रय गवळी, इम्तियाज मुलाणी, प्रेस फोटोग्राफर अक्षय आरडे, राजेंद्र भोसले, स्वप्नील चव्हाण यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी भरणे म्हणाले की, संकटाच्या काळात गोरगरिबांना दिलेला मदतीचा हात कदापि वाया जात नसतो. या गोष्टीची नस महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने परिपूर्ण ओळखल्याने लॉक डाऊन च्या पहिल्या आठवड्यापासून आजपर्यंत उपेक्षित भटक्या-विमुक्त तसेच गोरगरीब कुटुंबांना जीवनोपयोगी वस्तू धान्यपुरवठा प्रत्येक गावात जाऊन गोरगरिबांना दिला गेला आहे. तसेच तालुक्यातील इतर सामाजिक संस्थांनी किंवा दानशूर व्यक्तींनी गोरगरिबांना मदतीसाठी सढळ मानाने पुढे यावे असेही आवाहन यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
गोरगरिबांना संकटाच्या काळात पत्रकार संघाकडून होणारी मदत खऱ्या अर्थांंने स्फूर्ती देणारी आहे.अशी माहिती महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांनी दिली.

न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा