दसरा मेळाव्यावरून BMC वर वाढला दबाव, शिवसेनेनं मागितले लेखी उत्तर

मुंबई १७ सप्टेंबर २०२२ : राज्यात सत्ता संघर्ष झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे असंख्य आमदार फोडत नवीन सरकार स्थापन केलं आणि शिवसेना पक्ष ही आमचाच असा दावा केला आहे. त्यामुळे शिवसेना ही आमचीच आहे असं शिंदे गटातील नेत्यांकडून वारंवार बोलले जात आहे. त्यामुळे दसरा मेळावा कोण घेणार हा प्रश्न उभा राहिला आहे. आता तर शिवसेनेचे उपनेते मिलिंद वैद्य यांनी महापालिकेला लेखी उत्तर मागितल्याने बीएमसी वर मोठा दबाव वाढला आहे.

शिवसेनेचे नेते मिलिंद वैद्य आणि महापालिकेला एक पत्र पाठवत दसरा मेळाव्यासाठी परवानगी का मिळत नाही याबाबत दोन दिवसात खुलासा करण्याची मागणी केली आहे. शिवसेनेतील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही गट दसरा मेळावा शिवतीर्थावर घेणार असल्याचं बोललं जात आहे. पण, यासाठी महानगरपालिकेची परवानगी पाहिजे.

पहिली उद्धव ठाकरे यांच्या गटाने महापालिकेकडे परवानगी मागितली होती. पण त्यांना अजूनही परवानगी देण्यात आली नाही. याचा जाब मागण्यासाठी दादर विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी मिलिंद वैद्य, महेश सावंत आणि इतर पदाधिकारी यांनी अतिरिक्त आयुक्तांची भेट घेत त्यांना एक पत्र दिलं आहे.

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तांना मिलिंद वैद्य यांनी प्रश्न केला की, दसरा मेळावा साठी आम्ही आधी अर्ज केला असतानाही परवानगी का नाही? यावर आयुक्तांनी उत्तर दिलं आहे की, हे सर्व प्रकरण विधी व न्याय विभागाकडे आहे. त्यामुळे याबाबत आमच्याकडे कोणताही निर्णय झालेला नाही.

या दरम्यान शिवसेनेचे उपनेते मिलिंद वैद्य यांनी या पत्रामार्फत आयुक्तांना थेटपणे विचारल की, तुम्ही आम्हाला लेखी उत्तर द्या कारण, जर आम्हाला कोर्टात जावं लागलं तर महानगरपालिकेचा अधिकृत दाखला आम्हाला दाखवता येईल. तसेच मिलिंद वैद्य म्हणतात की, दरवर्षी शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा असतो. तरीपण आम्ही पत्र दिल्यानंतर हे आम्हाला स्पष्टपणे सांगितले होते की संध्याकाळपर्यंत तुम्हाला परवानगी देण्यात येईल. पण, आज किती दिवस झाले तरी आम्हाला काही प्रत्युत्तर आलं नाही. त्यामुळे आम्ही त्यांना थेट विचारला आहे की, परवानगी का देत नाही. तर त्यांनी हे प्रकरण विधी खात्याकडे असल्याचे सांगितले आहे.

दसरा मेळावा शिवतीर्थावर अर्थात शिवाजी पार्क मैदानात होणार पण हा मेळावा कोण घेणारे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा