Connie Francis PTSD story: इंटरनेटच्या या युगात, अगदी छोट्या छोट्या गोष्टी देखील काही मिनिटांतच व्हायरल होतात. अशाच प्रकारे अनेक ट्रेंड्स देखील वायरल होत आहेत जे आपण इन्स्टाग्रामवर पाहतो. सध्या इंस्टाग्रामवर एक गाणं खूप ट्रेंड करत आहे ते गाणं म्हणजे “Pretty Little Baby”. पण, तुम्हाला माहितीये का की हे गाणं कोणी गायले आहे. तर, 1962 साली कॉनी फ्रान्सिस या प्रसिद्ध गायिकेने हे गाणं गायलं आहे. कॉनी फ्रान्सिस १९व्या शतकातील एक अतिशय लोकप्रिय आणि ग्लॅमरस गायिका होती. खरतर तिच्या या प्रसिद्धी आणि ग्लॅमरमागे एक दुखद कहाणी लपली आहे त्या कहाणी मुळे तिला PTSD (पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर) चा सामना करावा लागला, आणि एका टप्प्यावर तिला आत्महत्या करायची इच्छा देखील झाली होती.
कॉनी फ्रान्सिसचा जन्म 12 डिसेंबर 1938 रोजी झाला. अगदी लहानपणापासूनच त्यांनी संगीत क्षेत्रात करिअर सुरू केलं. त्यांचे वडील जॉर्ज फ्रान्कोनेरो यांना कॉनीला एक यशस्वी संगीतकार बनवायचं होतं. त्यामुळे लहान वयातच त्यांनी कॉनीला विविध टॅलेंट शोमध्ये सहभागी व्हायला लावले आणि शिवाय तिला अॅकॉर्डियन वाजवायला शिकवलं. कॉनीच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय हे तिचे वडीलच घ्यायचे – ती कोणत्या म्युझिक अल्बमवर काम करेल किंवा कोणाशी लग्न करेल यापासून ते इतर मोठे निर्णय देखील तिचे वडील घ्यायचे. त्यांच्या या हस्तक्षेपामुळे कॉनी आणि बॉबी डॅरिन यांचं रिलेशनशिप देखील तुटलं. एकदा तर कॉनीच्या वडिलांनी बॉबी डॅरिनवर द जॅकी ग्लेसन शो मध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि यामुळेच बॉबी आणि कॉनीच रिलेशनशिप संपूर्ण नष्ट झाले.
खरतर कॉनीच्या आयुष्यात अनेक दुखद घटना घडल्या. एकदा वेस्टबरी म्युझिक फेअर मध्ये गायनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ती हॉवर्ड जॉन्सन मोटर लॉज येथील तिच्या खोलीत होती. खोलीत असताना तिथे एका हल्लेखोराने चाकूच्या धाकाने त्यांच्यावर बलात्कार केला. हल्ल्यानंतर त्या व्यक्तीने कॉनीला खुर्चीला बांधलं, खुर्ची खाली पाडली, आणि तिच्यावर गादी आणि सूटकेस ठेवली. हल्लेखोराने त्यांचे काही दागिने आणि मिंक कोट घेऊन पळ काढला. या घटनेने कॉनीच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला. ज्यामुळे ती खोलीत एकट राहायला देखील घाबरायची आणि शिवाय तिला एकटेपणाची भीती वाटू लागली. त्याच वर्षी आणखी एक दुखद घटना कॉनीच्या आयुष्यात घडली. कॉनीच्या भावाला माफिया हिटमेन नी गोळ्या घालून मारलं. कॉनी आणि तिचा भाऊ यांचं नातं खूपच घट्ट आणि जवळचं होतं. या घटनेनेमुळे तर कॉनी आणखी खचून गेली आणि तिला आत्महत्या करण्याची इच्छा होऊ लागली. मग तेव्हा तिने थेरपी घ्यायला सुरुवात केली, जिथे तिला PTSD असल्याचं निदान झालं.
आता PTSD म्हणजे काय?
PTSD (पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर) ही एक मानसिक स्थिती आहे, जी एखाद्या भयानक घटनेचा अनुभव घेतल्यानंतर किंवा ती पाहिल्यानंतर उद्भवते. ही स्थिती काही महिने किंवा वर्षं टिकू शकते. यामध्ये एखाद्या गोष्टीमुळे त्या भयानक आठवणी पुन्हा जाग्या होतात, ज्यामुळे तीव्र भावनिक आणि शारीरिक प्रतिक्रिया होतात.
लक्षणं काय आहेत?
स्वप्नात किंवा एखादी समान घटना पहिल्या वर त्या जुन्या घटनेच्या आठवणी येणं (फ्लॅशबॅक) आणि म्हणून त्या आठवणींना कारण ठरू शकणाऱ्या परिस्थितींपासून दूर राहणं. तणाव, चिंता. झोपेच्या समस्या आणि एकाग्रतेचा अभाव.
PTSD चा उपचार कसा होतो?
PTSD च्या उपचाराने व्यक्तीला त्यांच्या आयुष्यावर पुन्हा नियंत्रण मिळवता येतं. यासाठी मुख्य उपचार आहे टॉक थेरपी (साइकोथेरपी). याशिवाय, काहीवेळा औषधांचाही समावेश होतो. या उपचारांचे फायदे म्हणजे, लक्षणं व्यवस्थित हाताळण्याची क्षमता वाढते, स्वतःबद्दल, इतरांबद्दल आणि जगाबद्दल सकारात्मक विचार करता येतो.
पुन्हा लक्षणं उद्भवल्यास त्यांच्याशी सामना करण्याच्या पद्धती शिकता येतात. डिप्रेशन, चिंता किंवा व्यसन यासारख्या संबंधित समस्यांवर उपचार होतात.
PTSD च्या उपचार पद्धती देखील आहेत त्यातीलच एक म्हणजे एक्सपोजर थेरपी: या थेरपीत तुम्हाला भीती वाटणाऱ्या आठवणी आणि परिस्थितींना सुरक्षितपणे सामोरं जायला शिकवलं जातं. आता औषधाने देखील PTSD बरा करता येतो.
अँटिडिप्रेन्सन्ट्स: डिप्रेशन आणि चिंता कमी करतात, झोप आणि एकाग्रता सुधारतात.
अँटी-अँक्झायटी औषधं: तीव्र चिंता कमी करतात.
(पण ही औषधं फक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.)
इतर सेलिब्रिटी आणि PTSD;
कॉनी फ्रान्सिसशिवाय इतर अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या PTSD बद्दल खुलेपणाने बोललं आहे. अरियाना ग्रांडे यांनी सांगितलं की, त्यांच्या कॉन्स्सर्टरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे त्यांना PTSD चा सामना करावा लागला. प्रसिद्ध विनोदकार ट्रेसी मॉर्गन यांनीही सांगितलं की, एका भीषण कार अपघातानंतर त्यांना PTSD झाला. बॉलीवूडमधील अभिनेत्री दीपिका पादुकोण यांनीही त्यांच्या लिव्ह लव्ह लाफ फाउंडेशनद्वारे डिप्रेशन आणि PTSD बद्दल जागरूकता पसरवली आहे.
सेलिब्रिटींनी PTSD आणि मानसिक आरोग्याबद्दल खुलेपणाने बोलण्याचा सामान्य लोकांवर काय परिणाम होतो?
सेलिब्रिटी जेव्हा त्यांच्या PTSD किंवा मानसिक समस्यांबद्दल बोलतात, तेव्हा ते समाजात एक सकारात्मक बदल घडवतात. यामुळे सामान्य लोकांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याचं धैर्य मिळतं त्यांना मानसिक आजारबद्दल बोलायला लाज वाटत नाही, गैरसमज कमी होतात आणि उपचार घेण्यासाठी प्रेरणा मिळते. हे सगळं मिळून समाज मानसिक आरोग्याकडे अधिक संवेदनशील आणि जागरूक बनतो. कॉनी फ्रान्सिसची गोष्ट आपल्याला दाखवते की कोणतीही व्यक्ती, मग ती कितीही यशस्वी असली तरी, मानसिक समस्यांना बळी पडू शकते पण त्याला घाबरून न जाता त्यावर मात केली पाहिजे. जेव्हा कॉनी फ्रान्सिस, अरियाना ग्रांडे किंवा दीपिका पादुकोण यांसारखे सेलिब्रिटी त्यांच्या अनुभवांबद्दल बोलतात, तेव्हा समाजात मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढते आणि लोकांना स्वतःच्या भावना व्यक्त करण्याचं बळ मिळतं.
न्यूज अनकट प्रतिनिधी;जुई काळे