Samsung Galaxy S22 सिरीजची किंमत लीक

पुणे, 26 जानेवारी 2022: सॅमसंग पुढच्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये आपली पुढची फ्लॅगशिप सीरीज लॉन्च करणार आहे. Galaxy S22 सीरीज लॉन्च केल्याची पुष्टी कंपनीनं आधीच केली आहे. अहवालांवर विश्वास ठेवला तर, ब्रँड ही मालिका 9 फेब्रुवारी रोजी लॉन्च करंल. तेव्हापासून स्मार्टफोन मालिकेशी संबंधित नवीन तपशील बाहेर येऊ लागले आहेत. युरोपीयन किंमतीनंतर आता अमेरिकेच्या बाजारात येणाऱ्या स्मार्टफोन्सची किंमत लीक झालीय.

Samsung Galaxy S22 मालिकेची किंमत किती असंल

रिपोर्ट्सनुसार, यूएस मार्केटमध्ये Samsung Galaxy S22 ची सुरुवातीची किंमत $899 (जवळपास 67 हजार रुपये) असंल. त्याच वेळी, S22 Plus ची प्रारंभिक किंमत $ 1099 (सुमारे 82 हजार रुपये) पासून सुरू होईल आणि Galaxy S22 Ultra ची किंमत $ 1,299 (सुमारे 97 हजार रुपये) पासून सुरू होईल. लीक झालेल्या रिपोर्टमध्ये स्मार्टफोन्सची फक्त सुरुवातीची किंमत सांगण्यात आलीय.

युरोपमध्येही लीक झाली किंमत

मात्र, युरोपियन बाजारपेठेतील स्मार्टफोनच्या सर्व प्रकारांची किंमत लीक झाली आहे. जर लीक झालेली किंमत बरोबर असंल, तर यूएस मधील आगामी स्मार्टफोन मालिकेची सुरुवातीची किंमत मागील मालिकेतील उपकरणांपेक्षा $100 अधिक आहे. अशा वेळी जेव्हा सॅमसंगला बाजारात इतर ब्रँड्सकडून भरपूर स्पर्धा मिळत आहे, तेव्हा ग्राहक या उपकरणांना कसा प्रतिसाद देतात हे पाहावं लागंल.

अनेक नवीन फीचर्स आढळू शकतात

रिपोर्ट्सनुसार, Samsung Galaxy S22 सीरीजमध्ये अनेक मोठे बदल पाहिले जाऊ शकतात. असे संकेत कंपनीचे अध्यक्ष डॉ. टी.एम.रोह यांनी दिलीय. आगामी मालिकेत, ब्रँड अधिक चांगले कॅमेरा सेन्सर, नवीन डिझाइन यासारखे अनेक घटक जोडू शकतो. सॅमसंगनं या स्मार्टफोन सीरिजचे काही फीचर्स टीज केले आहेत. सॅमसंगची फ्लॅगशिप मालिका Apple आणि Google सारख्या ब्रँडशी थेट स्पर्धा करंल. US मध्ये Apple iPhone 13 Mini ची किंमत $ 699 पासून सुरू होते, तर Google Pixel 6 ची किंमत $ 599 पासून सुरू होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा