भारत की बेटी |भारत की शान| शिवांगी सिंह

अंबाला, २४ सप्टेंबर २०२० : चीनसोबत सुरु असलेल्या तणावादरम्यानच भारतीय हवाई दलाने राफेल विमानं एलएसीवर तैनात केली आहेत. सध्या लेह-लडाखवर राफेल कॉम्बेट एअर पेट्रोलिंग करताना दिसत आहेत. चीनजवळच्या एलएसीवर भारतीय हवाई दलाची लढाऊ विमानं दिवस-रात्र एअर कॉम्बेट पेट्रोलिंग करत आहेत.

भारताने फ्रान्सस‌ोबत ३६ राफेल लढाऊ विमानांचा करार केला होता. त्यापैकी पाच विमानांची पहिली बॅच भारतात पोहोचली आहेत, तर आणखी पाच विमानं पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये भारतात येणार आहेत. फ्रान्समधून आलेल्या पाच राफेल लढाऊ विमानांची पहिली बॅच १० सप्टेंबर रोजी अंबाला एअरबेसवर औपचारिकरित्या भारतीय हवाई दलात सामील झाली होती. ही विमानं हवाई दलाच्या १७ गोल्डन एरोज स्क्वॉड्रनचा भाग बनली.

भारतील हवाई दलात १० महिला वैमानिक आहेत. त्यातील फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह या राफेल लढाऊ विमानाचं उड्डाण करणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक बनल्या आहेत. शिवांगी सिंह कन्वर्जन ट्रेनिंग पूर्ण करताच हवाई दलाच्या अंबाला एअरबेसमधील याच १७ गोल्डन एरोज स्क्वॉड्रनमध्ये औपचारिक प्रवेश करतील! बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमधून शिक्षण पूर्ण केलेल्या फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह या महिला वैमानिकांच्या दुसऱ्या बॅचमधील आहेत. या बॅचचं कमिशनिंग २०१७ साली झालं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा