प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरावस्था, आरोग्य अधिकाऱ्यास तक्रार

बीड १५ जुलै २०२४ : लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रातील मुख्य ईमारतीला गळती सुरू झाली असून रूग्णांची हेळसांड होत आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.उल्हास गंडाळ यांना सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वात नागरिकांनी निवेदन दिलय.

बीड तालुक्यातील लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात लिंबागणेश पंचक्रोशीतील १२ वाड्यातील गोरगरीब रुग्णांना आरोग्य सेवा पुरविणाऱ्या, लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीतील स्लॅब खराब झाला असुन त्यातून पावसाळ्यात थेंब थेंब पाणी टपकत आहे. ही इमारत पुर्णतः जीर्ण झाली असून स्लॅब मधुन पावसाचे पाणी झिरपत असल्याने सध्या तपासणी कक्ष, बाळंतिनी कक्ष, बाह्य रुग्ण विभाग, मिटींग हॉल, आंतररुग्ण विभाग, औषधी विभाग, व्हरांडा याठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातून आलेल्या गोरगरीब गरजु रूग्णांची हेळसांड होत असून याबाबत प्रशासनाने तातडीने इमारतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकार्यांकडे केलीय.

न्युज अनकट प्रतिनीधी : सुनील जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा