पंतप्रधान मोदींनी एम्स मध्ये घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

नवी दिल्ली, १ मार्च २०२१: आजपासून कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. पंतप्रधान मोदी स्वत: सकाळीच नवी दिल्लीतील एम्स येथे दाखल झाले आणि कोरोना ची लस घेतली. यासह मोदींनी लोकांना कोरोना लस घेण्याचे आवाहन देखील केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले की, ‘मी एम्समध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला, कोरोनाविरूद्धच्या जागतिक लढाईला बळकट करण्यासाठी आपल्या डॉक्टरांनी आणि वैज्ञानिकांनी ज्या प्रकारे जलद गतीने काम केले हे कौतुकास्पद आहे, मी त्या सर्वांना आवाहन करतो जे लस घेण्यास पात्र आहेत त्यांनी एकत्रितपणे लस घेऊन भारताला कोरोना मुक्त केले पाहिजे. ‘

असे म्हटले जात आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे. दिल्लीतील एम्समध्ये काम करणार्‍या पुडुचेरीच्या पी. निवेदा यांनी पंतप्रधान मोदींना कोरोना लसीचा डोस दिला आहे. कोव्हॅक्सिन ही एक देशी लस आहे ज्यास भारतात आणीबाणीच्या वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा