‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी साधणार जनतेशी संवाद

नावी दिल्ली,२५ ऑक्टोंबर २०२०: कोरोनाच्या या महामारीच्या काळात पंतप्रधान मोदी सतत जनतेशी संवाद साधत आहेत. आज ते पुन्हा विजयादशमीच्या मुहूर्तावर देशवासियांना संबोधित करणार आहेत. योगायोग म्हणजे आज दसरा देखील आहे आणि या महिन्यातला शेवटचा रविवार. कारण दर महिन्यातल्या शेवटच्या रविवारी मोदी आपल्या रेडिओ कार्यक्रम मंकी बात च्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत असतात. आज सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधतील.

मात्र, आता हा प्रश्न उभा राहिला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोणत्या विषयावर बोलतील. कारण मागच्या दोन कार्यक्रमादरम्यान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर डिसलाइक आले होते. त्यामुळे आज मोदी कोणत्याही विषयावर बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. सलग दोन व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या डिसलाइक मागं काँग्रेसचा हात असल्याचा भाजप आरोप करत आहे.

“गेल्या २४ तासांत युट्यूबवर ‘मन की बात’ व्हिडिओला डिसलाईक करण्याचा संघटीत प्रयत्न झाला. कॉंग्रेसचा आत्मविश्वास इतका कमी झालाय की, ते हा एक प्रकारचा विजय मिळाल्याप्रमाणे साजरा करतायेत… पण यूट्यूबच्या डेटावरून दिसून येतंय की डिसलाईकपैकी केवळ २ टक्के भारतातून आहे. उर्वरित ९८ टक्के नेहमीप्रमाणे भारताबाहेरुन आहे”, असं ट्विट करत अमित मालवीय यांनी ‘मन की बात’चा व्हिडिओ ‘डिसलाईक’ करण्यासाठी मोहीम राबवण्यात आली होती असा आरोप काँग्रेसवर केला केला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा